Advertisement

राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर

नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे.

राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर
SHARES

नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे. राणा दाम्पत्याचा जामीन मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. यानंतर राणा दम्पत्याच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तब्बल 12 दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका झाली आहे.

दरम्यान, नवनीत राणा (Navneet Rana) यांना स्पॉंडिलायसिस असून त्यांच्या जीवाला काही झालं तर तुरुंग अधिकारी जबाबदार असतील, असं पत्र राणांच्या वकिलांना भायखळा तुरुंग अधीक्षकांना लिहिलं होतं.

त्यानंतर आज नवनीत राणांची प्रकृती (Navneet Rana Health) खालावली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्पॉंडिलायसिस त्रास असल्यास राणांवर उपचार होणार आहेत, यानुसार जे जे रुग्णालयातील सीटी स्कॅन, एमआरआय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. इतर ऑर्थोच्या तक्रारी असतील, तर त्या देखील त्यांच्या तक्रारीनुसार उपचार करण्यात येणार असल्याची जे जे रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा राणा दाम्पत्यांनी केली होती. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते.

पण पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली.

पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यानं जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या.

 


हेही वाचा

पनवेलमध्ये भोंग्यांशिवाय झाली पहाटेची अजान, मनसेने मानले आभार

राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ ट्विट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा