Advertisement

शिवसेनेला मुंबईतून तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही : आशिष शेलार

भाजपची कार्यकारिणी आज जाहीर झाली. त्यामध्ये आशिष शेलार यांच्याकडे दुसऱ्यांदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेनेला मुंबईतून तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही : आशिष शेलार
SHARES

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भ्रष्ट कारभाराला आणि त्यांच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिलाय.

ते पुढे म्हणाले की, महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) गेल्या तीन दशकांपासून फक्त कंत्राटदारांना पोसण्याचं काम शिवसेनेने (shiv sena) केलं. सांडपाणी निविदा प्रक्रियेतील दिरंगाई आणि त्यातील घोळ यापासून नेत्यांना पळ काढता येणार नाही. सांडपाणी निविदा प्रक्रियेत शिवसेनेने भ्रष्टाचार केलाय.

भाजपची कार्यकारिणी आज जाहीर झाली. त्यामध्ये आशिष शेलार यांच्याकडे दुसऱ्यांदा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. "आता आमचं ठरलंय, मुंबई महापालिकेत बदल अटळ आहे. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केलाय.

आशिष शेलार म्हणाले, " गेल्या दोन दशकांपासून मी लढत आहेत. भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचं आहे आणि मुंबईकरांच्या मनातील स्वप्नातील डोक्यातील विकासाचे मुंबईचं चित्र रंगवून, मुंबईकरांना सुपूर्त करायचं आहे. निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडवरचे काम, मेट्रो तीन आणि कारशेडमधील अहंकार, यातून मुंबईकरांच्या डोक्यावर भुर्दंड टाकला जातोय, असा आरोप यावेळी शेलार यांनी केलाय.



हेही वाचा

शिंदे गट दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार

बुलेट ट्रेनचा 25% खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा