Advertisement

मिलिंद देवरा करणार मुंबईतील नालेसफाईची पाहणी

मुंबई महापालिका मुंबईतील नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याचा दावा करत आहे. पालिकेच्या दाव्यानुसार खरचं नाल्यांची सफाई झाली आहे का याची पडताळणी करण्यासाठी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा मुंबईतील नालेसफाईची पाहणी करणार आहेत.

मिलिंद देवरा करणार मुंबईतील नालेसफाईची पाहणी
SHARES

मुंबईसह राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली आहे. मात्र, मुंबईत अनेक ठिकाणच्या नाल्यांची साफसफाई झाली नसल्याचं चित्र आहे. परंतु, मुंबई महापालिका मुंबईतील नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याचा दावा करत आहे. पालिकेच्या दाव्यानुसार खरचं नाल्यांची सफाई झाली आहे का याची पडताळणी करण्यासाठी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा मुंबईतील नालेसफाईची पाहणी करणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुंबईतल्या धारावी-९० फीट रोड येथून या नालेसफाई पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

मुंबईकर त्रस्त

'दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी तुंबतं. जरासा पाऊस पडला तरी, मुंबईत काही ठिकाणी पाणी तुंबतंत्यामुळं प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन मुंबईकर त्रस्त होतात. तसंच, काही ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्यानं आणि गटाराचे किंवा नाल्याची झाकण उघडी असल्यानं अनेकांना आपला जीव गमावावा लागतो. याला कारण एकच, अर्धवट नालेसफाई' असा आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे.

या नालेसफाई पाहणी दरम्यान मिलिंद देवरा यांच्या सोबत काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाडआमदार वर्षा गायकवाडभाई जगतापनसीम खानअमीन पटेलअस्लम शेखमाजी आमदार चरणसिंग सप्रा आणि मनपा विरोधी पक्ष नेते रवी राजा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.



हेही वाचा -

मुंबईकरांच्या पाणीपट्टीत २.४८ टक्क्यांनी वाढ

मुंबईत पाणीकपात, रहिवाशांचे प्रचंड हाल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा