Advertisement

मोजोसचे ५ भागीदार नागपूरचे - संजय निरुपम


मोजोसचे ५ भागीदार नागपूरचे - संजय निरुपम
SHARES

महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची गंगोत्री आयुक्तांच्या कार्यालयातून वाहत आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांची मूक कबुली आहे. मुख्यमंत्री आयुक्तांमार्फत चौकशी करून लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करत आहेत. मोजोस बिस्ट्रो पबवर ९ दिवसांनी अग्निशमन विभागाचा हवाल सादर झाल्यावर कारवाई झाली. कारण ती कारवाई सरकारला करायचीच नव्हती. त्यातील ६ भागीदारांपैकी ५ भागीदार नागपूरचे असल्याने मुख्यमंत्री त्यांना वाचवत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने नागपूरचे लोक मुंबईत येत आहेत आणि येथील जीवनशैलीला गालबोट लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


सीबीआय, न्यायालयीन चौकशी व्हावी

कमला मिल दुर्घटनेची पाळेमुळे मुंबई महापालिकेच्या खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांमध्येच रुजली नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही हात यांत गुंतलेले असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. या प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी करत निरूपम यांनी आयुक्तांनाही याप्रकरणी दोषी धरलं. एवढंच नव्हे, तर आयुक्तांवर ज्या नेत्यांनी दबाव आणल्याचं ते सांगत आहेत, त्या नावाचा खुलासा करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.


'स्मॅश गेमिंग सेंटर' पुन्हा सुरू

कमला मिलमधील दुर्घटना घडल्यानंतर लगेच सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी करूनही सरकारने त्याच्याकडे कानाडोळा करत आयुक्तांना चौकशीसाठी नेमलं. या नंतर अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली आणि आता कारवाई करण्यात आलेलं 'स्मॅश गेमिंग सेंटर' पुन्हा सुरु झालं आहे. 'स्मॅश गेमिंग सेंटर'मधील बांधकाम अनधिकृत असूनही याला खुद्द आयुक्तांनी परवानगी दिल्याचंही संजय निरुपम यांनी प्रसार माध्यमांना पुराव्यासह दाखवलं.


सगळ्यांचे हात बरबटलेले

येथील रेसिंग ट्रॅकला परवानगी नसतानाही ते बांधण्यात आलं. मग आयुक्तांनी परवानगी देऊन ते नियमित केल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये आयुक्तांसह, मोठ्या पदावरील अभियंते सामील असल्याचं निरूपम यांनी सांगितलं. सर्वसामान्यांची महापालिकेतील कामे महिनोंमहिने तशीच पडून राहतात. मात्र व्यावसायिक बांधकामे अनधिकृत असूनही त्यांना आठवड्याभरात परवानगी मिळते, असं म्हणत निरूपम यांनी महापालिकेतील लहान-मोठ्या सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांची बोटं भ्रष्टाचारात बरबटल्याचा आरोपही केला.


रुफ टाॅप पॉलिसी

रुफ टाॅप पॉलिसीला आपला विरोध नाही. मात्र ज्या गोष्टी नियमांत बसत नाहीत जिथे सुरक्षा नाही, त्याची तजवीज नाही तेथे अशी पॉलिसी राबविण्यासाठी महापालिका का धडपड करत आहे? असा सवाल संजय निरुपम यांनी केला. कुणाच्या सांगण्यावरून हुक्का बारसाठी आणि रुफ टाॅप पाॅलिसीसाठी महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरु आहे हे स्पष्ट करावं, अशी मागणी त्यांनी केली.



हेही वाचा-

कमला मिल आग: मोजोस बिस्ट्रोचे मालक युग पाठकला अटक

कमला मिलमधील हॉटेल तोडताना दबाव आला; अजोय मेहता यांचा गौप्यस्फोट


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा