Advertisement

तावडे, मेहता आणि देसाईंच्या राजीनाम्यासाठी मुंबई काँग्रेसचे शिष्ठमंडळ राज्यपालांना भेटले


तावडे, मेहता आणि देसाईंच्या राजीनाम्यासाठी मुंबई काँग्रेसचे शिष्ठमंडळ राज्यपालांना भेटले
SHARES

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली.

मुंबई विद्यापीठातीलनिकालांची नियोजित तारीख टळली, तरीही अजून निकाल जाहीर झालेले नाहीत. रोज 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेले आहे. पालक आणि विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत. तरीही शिक्षणमंत्री विनोद तावडे पर्यायाने भाजपा सरकारला त्याचे गांभीर्य नाही. विनोद तावडेयांनी नैतिक जबादारी स्वीकारत स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता. पण असे झालेले नाही. कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवून हा प्रश्न सुटणारा नाही. तेव्हा राज्यपालांनी स्वतःचा घटनादत्त अधिकार वापरत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा त्वरीत राजीनामा घ्यावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.

तसेच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ही एसआरए योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. बिल्डरांच्या मर्जीतले निर्णय घेतलेले आहेत. भाजपा सरकार स्वतःला पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार म्हणते. पण त्यांचेच मंत्री मोठमोठे घोटाळे आणि भ्रष्टाचार करत आहेत. अधिवेशनात विरोधकांनी  याबाबतचे सर्व पुरावे सादर केलेले आहेत. या भ्रष्ट मंत्र्यांमुळे अधिवेशन ही सुरळीत चालू शकलेले नाही. हे सरकार कोणाचेच ऐकत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत, तेव्हा तुम्हीच स्वतः लक्ष घालून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचादेखील राजीनामा  घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.


उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीमध्ये ५०,००० हजार करोड रुपयांचा घोटाळा केलेला आहे. एमआयडीसीची जमीन बिल्डरला कवडीमोल भावाने दिली. हा एक खूप मोठा घोटाळा आहे. त्यांचाही राजीनामा आपण आपला अधिकार वापरून घ्यावा, अशी आमची विनंती आहे. आम्ही अशी मागणी करत आहोत की, या तिन्ही मंत्र्यांची आपण आपल्या पद्धतीने संपूर्ण चौकशी करून संबंधितांचा राजीनामा घ्यावा.

संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा