Advertisement

आंदोलनाची माहिती मिळताच प्रकाश मेहता पळाले - संजय निरूपम


आंदोलनाची माहिती मिळताच प्रकाश मेहता पळाले - संजय निरूपम
SHARES

राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे. मेहतांच्या राजीनाम्यासाठी शनिवारी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम आणि सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मेहतांच्या घरासमोर आंदोलन केले. मात्र मेहता यांना आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी घरातून पळ काढल्याचे निरूपम यांनी सांगितले.


मेहतांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

हाती राजीनामा पत्र घेऊन निरूपम यांनी मेहता यांना त्यावर सही करण्याचे आवाहन केले. यावेळी निरूपम आणि सावंत यांनी मेहतांच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी दोघांनाही अडवले. त्यानंतर दोघेही रस्त्यावर ठाण मांडून बसले. त्यानंतर पोलिसांनी निरुपम आणि सावंत यांना ताब्यात घेत काही वेळाने सोडून दिले.



काय आहे नेमके प्रकरण?

ताडदेवमधल्या एम. पी. मील कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

त्याचे पडसाद अधिवेशनात देखील उमटले आहेत. शुक्रवारी प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी विधान परिषदेच्या सभागहातील कामकाज ८ वेळा बंद पाडले होते.


प्रकाश मेहता भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही आज हे आंदोलन केले. दररोज नवनवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. लोकांना माहित झाले आहे की प्रकाश मेहता नेमके कसे आहेत? तरीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रीमंडळात का ठेवले आहे? त्यामुळेच आम्ही मेहतांचा राजीनामा घेऊन त्यांच्या घरी गेलो होतो. मात्र ते आंदोलनाची माहिती मिळताच पळून गेले.
संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस



हे देखील वाचा -

'...प्रकाश मेहता चोर है!'



 डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा