मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाचा फैसला काय?

मराठा आरक्षणासंदर्भात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांचं खंडपीठ या प्रकरणी निर्णय देणार आहेत.

SHARE

मराठा आरक्षणासंदर्भात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम निकाल जाहीर होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांचं खंडपीठ या प्रकरणी निर्णय देणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात ४ याचिका विरोधात आणि २ याचिका समर्थनार्थ दाखल झाल्या आहेत. त्याशिवाय, एकूण २२ हस्तक्षेप अर्ज दाखल झाले असून, यामध्ये १६ अर्ज आरक्षणाच्या समर्थनात आणि ६ अर्ज विरोधात असल्याची माहिती समोर येतं आहे. त्यामुळं मराठा आरक्षण वैध की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

१६ टक्के आरक्षण

राज्यातील मराठा समाजाला नोकऱ्या व शैक्षणिक अभ्यासक्रमांतील प्रवेशात १६ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात व समर्थनात करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर ६ फेब्रुवारीपासून जवळपास रोज सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं २६ मार्च रोजी या याचिकांबाबतचा आपला निर्णय राखून ठेवला होता. यानंतर मे महिन्याच्या सुट्ट्या आल्यानं मराठा आरक्षणावरील याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही.

जनहित याचिका

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारनं ३० नोव्हेंबर २०१८ रोजी केला होता. त्यानंतर त्याला आव्हान देण्यासाठी अनेकांनी जनहित याचिका केल्या होत्या, तर काहींनी कायद्याच्या समर्थनार्थ याचिका दाखल केल्या होत्या. त्यामुळं गुरुवारी होणाऱ्या अंतिम निर्णयादरम्यान न्यायालय काय निर्णय देणार याकडं सर्व मराठ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.हेही वाचा -

मेन इन ब्ल्यू घालणार भगवी जर्सी, अबू आझमींनी घेतला आक्षेपसंबंधित विषय
ताज्या बातम्या