सत्तेसाठी शिवसेनेची जोरदार फिल्डिंग

 Kalanagar
सत्तेसाठी शिवसेनेची जोरदार फिल्डिंग
सत्तेसाठी शिवसेनेची जोरदार फिल्डिंग
See all

मातोश्री - मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने जोरदार फिल्डिंग लावली आहे. मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. शिवेसनेतून बंडखोरी करून प्रभाग क्रमांक 125 मधून जिंकून आलेल्या स्नेहल मोरे पुन्हा शिवसेनेत आल्या आहेत. तर दिंडोशीतील प्रभाग क्रमांक 41 मधील अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे हे देखील आता स्वगृही येत आहेत. त्यामुळे शिवसेनेची संख्या आता 84 वरून 86 होणार आहे. शुक्रवारी शिवसेनेच्या निवडून आलेल्या उमेदवारांनी मातोश्रीवर शुभेच्छा घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा महापौर बसेल असा विश्वास व्यक्त केला.

Loading Comments