Advertisement

दक्षिण मुंबईत शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्यास पालिकेची मंजुरी

दक्षिण मुंंबईत (South Mumbai) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचा पूर्णाकृती पुतळा (Statue) उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) सभागृहाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

दक्षिण मुंबईत शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्यास पालिकेची मंजुरी
SHARES

दक्षिण मुंंबईत (South Mumbai) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचा पूर्णाकृती पुतळा (Statue) उभारण्यात येणार आहे. पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) सभागृहाच्या मंगळवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेने मंजुरी दिली असली तरी राज्य सरकार, वाहतूक पोलीस, वाहतूक व समन्वय, पुरातन वास्तू संवर्धन समिती आदींच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारती (National Gallery of Modern Art Buildings) समोर महात्मा गांधी रोड (Mahatma Gandhi Road) वरील डॉ. श्यामाप्रसाद  मुखर्जी चौकातील वाहतूक बेटावर शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याचा प्रस्ताव मंगळवारी पालिका सभागृहात सादर करण्यात आला. याला पालिका सभागृहाने मंजुरी दिली.  पुतळा उभारण्यासाठी शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसमोर हा प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. 

पुतळा संचालक कला महाराष्ट्र राज्य, सर जेजे स्कूल ऑफ आर्ट; प्रमुख वास्तुविशारद, महाराष्ट्र शासन; पोलीस आयुक्त, वाहतूक, मुंबई; कार्यकारी अभियंता, वाहतूक व समन्वय; पुरातन वारसा वास्तू संवर्धन समिती यांच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राचीही पुतळा उभारण्यासाठी आवश्यकता आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या भागात बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचा पुतळा उभारू नये, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे दक्षिण मुंबईतील एका रहिवासी संघटनेने केली आहे. 

फेडरेशन ऑफ रेसिडेंट ट्रस्ट्स (फोर्ट) या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. फेडरेशन ऑफ रेसिडेंट ट्रस्ट्स (फोर्ट) ही संघटना ओव्हल कुपरेज रेसिडेंट असोसिएशन (ओसीआरए), नरिमन पॉइंट चर्चगेट सिटीझन असोसिएशन (एनपीसीसीए) आणि ओव्हल ट्रस्ट या संघटनांनी शिखर संघटना आहे.  ज्या ठिकाणावर बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारला जाणार आहे, ते ठिकाण युनेस्को जागतिक वारशांच्या यादीत येते. या कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्यासाठी योग्य पर्यायी जागा शोधावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. या ठिकाणाहून  गेट वे ऑफ इंडियाकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे येथे नेहमी वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असते.  पुतळ्याची नियोजित जागा आणि पुतळ्याची उंची पाहता, या चौकातील वाहतुकीच्या नियमनावर लक्ष ठेवण्यात मोठे अडथळे निर्माण होतील, असं पत्रात म्हटलं आहे. 



हेही वाचा -

मनसेच्या झेंड्याविरोधात कोर्टात जाणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

‘शिवसैनिकांनो, मनसेचा झेंडा हाती घ्यायची हिच ती वेळ’




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा