SHARE

एप्रिलमध्ये अर्थसंकल्पी सिनेट पार केल्यानंतर अर्धवार्षिक सिनेट ऑक्टोबरमध्ये घेण्यात येतं. त्यानुसार, मुंबई विद्यापीठाचे अर्धवार्षिक सिनेट येत्या १८ ऑक्टोबरला विद्यापीठानं आयोजन केलं होतं. मात्र, विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळं विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मोठ्या संख्येनं केल्यानं अधिसभा नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात घ्यावी, अशी मागणीविद्यापीठानं राज्यपालांकडं केली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सिनेट होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीचं काम

यंदा ही सभा १८ ऑक्टोबरला घेण्याचे नियोजन विद्यापीठानं केले होतं. परंतु, विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकांची कामं लागली आहेत. तसंच, कर्मचाऱ्यांनाच मोठ्या संख्येनं निवडणुकीचं काम दिल्यानं सिनेट पुढे ढकलण्यात आली आहे.

अधिसभा बैठक पुढे 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या आचारसंहितेमुळे राज्यातील विद्यापीठांची अर्थसंकल्पीय अधिसभा (सिनेट) बैठक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र यासंदर्भात आचारसंहिता विद्यापीठांना लागू नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने २४ एप्रिलला मुंबई विद्यापीठाकडून सिनेट बैठक जाहीर करण्यात आली.हेही वाचा -

सौरव गांगुली बनणार BCCIचा नवा अध्यक्ष?

मध्य रेल्वेवरील प्रवाशांची एटीव्हीएम तिकीट विक्रीला पसंतीसंबंधित विषय
ताज्या बातम्या