निवडणुकीसाठीच जनसंपर्क?

मुंबई - निवडणूक जवळ आली की प्रत्येक पक्षातील उमेदवार आणि कार्यकर्ते आपल्याला गल्लोगल्ली जाऊन प्रचार करताना दिसतात. मतदारांना आपल्या समस्या सांगता याव्यात यासाठी परिसरातील नाक्या-नाक्यावर अनेक पक्षांची जनसंपर्क कार्यालयं उघडली जातात. पण, ही कार्यालयं तात्पुरतीच असतात असा आरोप मुंबईकर करत आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागलाय. पण, निवडणुकीत सक्रिय झालेले जनप्रतिनिधी निवडणुकीनंतर मात्र गायब होतात अशी तक्रार मुंबईकरांची आहे. या निराशेचे पडसाद येत्या निवडणुकीत उमटतात का हे पाहणं महत्त्वाच ठरेल.

Loading Comments