Advertisement

माझा पूरग्रस्त भागातील दौरा सुरूच राहणार- देवेंद्र फडणवीस

शासकीय यंत्रणेत अडथळा न आणता माझा दौरा सुरूच राहील, असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

माझा पूरग्रस्त भागातील दौरा सुरूच राहणार- देवेंद्र फडणवीस
SHARES

सरकारी यंत्रणांच्या कामात अडथळा नको, या उद्देशाने राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळावेत असं आवाहन नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. परंतु विरोधी पक्षनेत्याच्या दौऱ्याला फारशी शासकीय यंत्रणा नसते शिवाय आम्ही गेल्यामुळे शासकीय यंत्रणा हलते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा आक्रोश समजावून घेत तो आम्हाला सरकारपुढं मांडता येतो. त्यामुळे शासकीय यंत्रणेत अडथळा न आणता माझा दौरा सुरूच राहील, असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी स्पष्ट केलं.

राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे मदतकामात व्यस्त असलेली यंत्रणा थांबता कामा नये, असा शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. मात्र, आम्ही जातो तेव्हा त्याठिकाणी फारशी शासकीय यंत्रणा नसते. पण आम्ही गेल्यावर शासकीय यंत्रणा जागी होते, त्यासाठी आमचे दौरे महत्त्वाचे असतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील २८ ते ३० जुलै दरम्यानचा तीन दिवसीय दौरा मी करणारच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप युती होणार?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना फोन करून महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेतला होता. शिवाय राज्यपालांचा दौरा हा राष्ट्रपतींच्या सूचनेनुसारच आहे. राज्यपालांनी चार प्रमुख पक्षांच्या एका आमदारांना या दौऱ्यासाठी बोलावलं होतं. परंतु सत्ताधारी पक्षातील एकही आमदार त्यांच्यासोबत गेला नाही. केवळ भाजपकडून आशिष शेलार राज्यपालांसोबत आहेत, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

दरम्यान जनतेला प्रशासकीय मदतीची खूप गरज आहे. पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण, मला असं वाटतं की, माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडतो. कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. त्यामुळे पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं. म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं, असं मत शरद पवार (sharad pawar) यांनी व्यक्त केलं होतं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा