Advertisement

उदयनराजेंची नाराजी दूर? शरद पवारांशी केली २ तास चर्चा

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले देखील पक्षाला सोडचिठ्ठी देणार असं म्हटलं जात होतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी भेट घेऊन त्यांची समजूत काढली.

उदयनराजेंची नाराजी दूर? शरद पवारांशी केली २ तास चर्चा
SHARES

भाजपने सुरू केलेल्या मेगाभरतीत सामील होऊन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले देखील पक्षाला सोडचिठ्ठी देणार असं म्हटलं जात होतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी भेट घेऊन त्यांची समजूत काढली. यामुळं उदयनराजे तूर्तास तरी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

सकारात्मक प्रतिसाद

शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात जवळपास २ तास बैठक झाली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी पवार यांनी उदयनराजेंची राष्ट्रवादीतून बाहेर न पडण्याविषयी समजूत घातली. त्यावर उदयनराजेंनी पवार यांना सकारत्मक प्रतिसाद दिल्याचं म्हटलं जात आहे.

चुकीचा अर्थ

बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे म्हणाले की, “ नुकत्याच झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे मुद्दे आणि रणनीतीवर चर्चा करण्यात आली. उदयनराजेंची नाराज नसून ते पक्षातच राहणार आहेत. ते भाजपात प्रवेश करतील, या अफवा निरर्थक आहेत. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान ते वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त होते. त्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. उलट ते येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारात झोकून देऊन काम करतील.”



हेही वाचा-

ईडीच्या चौकशीपासून राज ठाकरे बोलायचे कमी झालेत- अजित पवार

भाजपात मेगाभरती पार्ट २, कोण कोण जाणार?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा