Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

बीएमसीच्या कारवाईमुळे संशय निर्माण होण्याची संधी, शरद पवारांची कंगनावर प्रतिक्रिया

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, कंगना रणौतचं कार्यालय अधिकृत आहे की अनधिकृत हे आपल्याला ठाऊक नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाही.

बीएमसीच्या कारवाईमुळे संशय निर्माण होण्याची संधी, शरद पवारांची कंगनावर प्रतिक्रिया
SHARES

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणारी अभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयावर कारवाई करून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने सूड उगवल्याचं म्हटलं जात आहे. त्याबाबत भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कारवाईमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत असल्याचं म्हटलं. (ncp chief sharad pawar reacts on actress kangana ranaut and bmc issue)

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, कंगना रणौतचं कार्यालय अधिकृत आहे की अनधिकृत हे आपल्याला ठाऊक नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु मुंबईत बेकायदेशीर बांधकामं काही नवीन गोष्ट नाही. सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहोत. पण शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियमावली आहे, त्यांना जे योग्या वाटलं ते त्यांनी केलं असेल.

हेही वाचा- कोरोनाचं अपयश झाकण्यासाठीच कंगनावर कारवाई, भाजपची टीका

कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत असल्याचं मला वाटतं. परंतु माझ्या मते अशा वक्तव्यांना कोणीही गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कतृत्त्व त्यांनी माहिती आहे. त्यामुळे कोणी मुंबईची पाकिस्तानशी तुलना वैगेरे केली तर तिकडं फारसं लक्ष देण्याची गरज नाही, असं देखील शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान,  राज्यात खासकरून मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. हे अपयश झाकण्यासाठीच अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई करण्यात येत आहे. अहंकार आणि सूडाच्या भावनेतून ही कारवाई होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांना मी संध्याकाळपर्यंत १०० अनधिकृत बांधकामांची यादी देणार आहे. त्यावर महापौर २४ तासांत कारवाई करणार? हे सुद्धा आम्ही बघू. मुंबईतील ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांवर भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्याविरोधात सर्वसामान्य रहिवाशांच्या असंख्य तक्रारी येऊनही महापालिका जागची हालत नाही. अशा कुठल्या अनधिकृत बांधकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली? याची माहिती महापौरांनी द्यावी, असं आव्हान देखील प्रवीण दरेकर यांनी दिलं.

हेही वाचा- आज माझं घर तुटलं, उद्या तुमचा अहंकार मोडेल, कंगनाचा उद्धव ठाकरेंवर संताप

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा