Advertisement

“संभाजीनगर म्हणा, नाहीतर धाराशीव..”, नामांतर वादावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले

नामांतर वादावर आतापर्यंत शांत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत.

“संभाजीनगर म्हणा, नाहीतर धाराशीव..”, नामांतर वादावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले
SHARES

औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी पडलेली असतानाच मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून उस्मानाबादचा उल्लेख धाराशीव असा करण्यात आल्याने वातावरण आणखीनच तापलं आहे. या नामांतर वादावर आतापर्यंत शांत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ, महाराष्ट्र) अधिकृत ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजी नगर असा करण्यात आला होता. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांचा फोटो वापरण्यात आला होता. काँग्रेसचा कुठल्याही नामांतराला विरोध असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी तातडीने आपली नाराजी व्यक्त केली होती. शिवाय अशा परस्पर नामांतराला ठाम विरोध असून हे सरकार किमान समान कार्यक्रमावरच चालले असं बजावलं होतं.

हेही वाचा- संभाजी राजेंचं नाव वापरणं हा काही गुन्हा नाही- संजय राऊत

त्यावर, रंगाबादचा संभाजीनगर असा करण्यात आलेल्या उल्लेखात नवीन काय आहे?  जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे, तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार. औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे, त्याच्यात औरंगजेब बसत नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मांडली होती. 

त्यातच आणखी एका ट्विटमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून उस्मानाबादचा उल्लेख धाराशीव असा करण्यात आल्याने नवा वाद उभा राहीला. औरंगाबाद आणि उस्मानाबाद अशा दोन्ही शहरांचा उल्लेख शिवसेना संभाजीनगर व धाराशीव असा करते, नामांतराबाबतची शिवसेनेची भूमिका आहे. तशीच काँग्रेसचीही एक भूमिका आहे. तिन्ही पक्षांच्या भूमिका आपापल्या ठिकाणी आहेत. कुणी कुठल्या नावाचा आग्रह धरावा हा पक्षांतर्गत प्रश्न आहे.सरकारशी त्याचा काहीही संबंध नाही. कारण, सरकार किमान समान कार्यक्रमावर बनलेलं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayan patil) यांनी दिली होती. 

तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादला संभाजीनगर म्हणा, उस्मानाबादला धाराशीव म्हणा, नाहीतर अजून काहीही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे मी या विषयावर कधीही भाष्य केलं नाही, असं म्हणत या विषयातील हवा काढून घेतली आहे.

(ncp chief sharad pawar reacts on name change issue of aurangabad and osmanabad)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा