Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस देखील लढवणार बिहार निवडणूक, स्टार प्रचारकांची यादी जाहीर

बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेपाठोपाठ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस देखील लढवणार बिहार निवडणूक, स्टार प्रचारकांची यादी जाहीर
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील बिहार विधानसभा निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी नेमक्या किती जागा लढवेल हे अद्याप स्पष्ट नसलं, तरी या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेपाठोपाठ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. (ncp declares 40 star campaigners list for bihar assembly election 2020)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयातून एकूण ४० स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये मुख्य स्टार प्रचारक हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हेच असतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या ४० जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, के. के. शर्मा, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राजीव झा, नरेंद्र वर्मा, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. जे. जोसेमन, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, पुष्पेंद्र मलिक, सीमा मलिक, विरेंद्र सिंग, गोविंदभाई परमार, वेदपाल चौधरी, उमाशंकर यादव, एस. पी. शर्मा, मुरलीमनोहर पांडे, नवलकिशोर साही, राहत काद्री, जितेंद्र पासवान, ललिता सिंग, संजय केशरी, इस्तियाक आलम, अकबर अली, मनोज जैस्वाल, खुशारो आफ्रीदी, ब्रिजबिहारी मिश्रा, शकील अहमद, अझर आलम, इंदू सिंग, चांदबाबू रहेमान, चंद्रेश कुमार, चंद्रशेखर सिंग या नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा- बिहार निवडणुकीत शिवसेनेचे ‘इतके’ उमेदवार, 'ठाकरी' तोफही धडाडणार!

सन २०१५ मधील बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १ लाख ८५ हजार ४३७ मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या गृहखात्याला, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा मोठा प्रयत्न झाला. त्यामुळे शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी देखील सुशांतचा मुद्दा हाताशी धरून प्रचार करणार असल्याचं दिसत आहे. 

दरम्यान, शिवसेनेने ५० उमेदवार बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं ठरवलेलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर २० स्टार प्रचारक शिवसेनेचा प्रचार करणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा