Advertisement

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; माढा, नगरबाबत सस्पेंस कायम

पहिल्या यादीत राष्ट्रवादीच्या ९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक या विद्यमान खासदारांसह अन्य ६ जणांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; माढा, नगरबाबत सस्पेंस कायम
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. यामध्ये राज्यातील १० तर लक्षद्विपमधील एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली. यामध्ये सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक या विद्यमान खासदारांसह अन्य ७ जणांचा समावेश आहे.


माढा, नगरबाबत सस्पेंस

माढा, अहमदनगरसह अन्य जागांवरील उमेदवारीबाबतचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सस्पेंस कायम ठेवण्यात आला आला आहे. तसंच हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी स्वाभिमानीला पाठिंबा देणार आहे. तसंत उर्वरित नावांची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत जाहीर करण्यात करण्यात येणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

  

कोण आहेत उमेदवार ? 

रायगडमधून सुनील तटकरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, बुलडाणा येथून राजेंद्र शिंगणे, जळगावातून गुलाबराव देवकर, परभणीतून राजेश विटेकर, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील, ठाण्यातून आनंद परांजपे, कल्याणमधून बाबाजी बाळाराम पाटील आणि कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा -

पवारांच्या मनात विखे परिवाराबद्दल द्वेष का ? विखे-पाटलांचा सवाल

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement