Advertisement

पवारांची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुक्रवारी दुसरी यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार याला मावळ मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

पवारांची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात
SHARES

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुक्रवारी दुसरी यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पूत्र पार्थ पवार याला मावळ मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.


कोल्हेही रिंगणात

काही दिवसांपूर्वीच शिवबंधन तोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलेल्या अमोल कोल्हे यांना शिरूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. शुक्रवारी अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

आता त्यांच्यासमोर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार शिवाजीराव अढळराव-पाटील यांचं तगड आव्हान असणार आहे. तर या व्यतिरिक्त नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोने आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु अहमदनगर आणि माढाच्या जागांवर अद्यापही सस्पेंस कायम ठेवण्यात आला आहे.



हेही वाचा - 

प.. प.. कोणाचा... ?

१ एप्रिलपासून नॅचरल गॅसची किंमत वाढणार ?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा