Advertisement

तुमचा भुजबळ करू असं सांगतात, ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

ईडी म्हटलं की लोक घाबरतात. तुमचा भुजबळ करु असं सांगितलं जातं.

तुमचा भुजबळ करू असं सांगतात, ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील अंमलबजावणी संचलनालयाच्या कारवाईमुळे सत्ताधारी चिंताग्रस्त झाले आहेत. याविषयी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांना विचारणा केली असता त्यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितलं की, कुणावर तरी आरोप करायचे, कुणाला तरी नोटिसा द्यायच्या असं सध्या सुरु आहे. त्यात ईडी म्हटलं की लोक घाबरतात. तुमचा भुजबळ करु असं सांगितलं जातं. पण, ईडीला त्या लोकांकडून उत्तर दिलं जाईल.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने अजित पवार (ajit pawar) यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे. 

हेही वाचा- सीबीआय कोणाच्या आदेशानुसार चौकशी करते हे भाजपने दाखवून दिलं- सचिन सावंत

सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीत घोटाळा झाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली असून याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विक्री झालेल्या ४२ कारखान्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व कारखान्यांच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

निलंबित पोलीस सहायक निरिक्षक सचिन वाझे यांनी सीबीआयला लिहिलेल्या पत्रात परिवहनमंत्री अनिल परब (anil parab) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पैसे वसुलीसंदर्भातील आरोप केले आहेत. या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी भाजपची मागणी आहे. याबाबतचा ठराव नुकत्याच झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी हे पत्र लिहिलं आहे. 

(ncp leader chhagan bhujbal comment on ED action on ajit pawar and anil parab)

हेही वाचा- अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, चंद्रकांत पाटलांचं गृहमंत्र्यांना पत्र


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा