Advertisement

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

राज्याचे कामगार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती वळसे पाटील त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे.

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण
SHARES

राज्याचे कामगार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती वळसे पाटील त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह (covid positive) आल्याने वळसे पाटील यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं असून डाॅक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दिलीप वळसे पाटील यांचा वाढदिवस आहे.

दैनंदिन कामकाजासाठी वळसे पाटील मंत्रालयात उपस्थित होते. अहवाल येताच ते घरी परतल्याचं समजतं. तसंच, नुकतेच एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या प्रवेशाच्या सोहळ्याला वळसे-पाटील उपस्थित होते.

नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवरून दिलं आहे. (NCP leader Dilip Walse Patil tests positive for COVID-19)

महाविकास आघाडी सरकारमधील १५ हून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असून काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. 

तर त्याआधी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, बच्चू कडू, या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.


हेही वाचा- 

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा