Advertisement

कोरोनाच्या सदृश्य लक्षणांमुळे खडसे यांनी चौकशीला येणं टाळलं


कोरोनाच्या सदृश्य लक्षणांमुळे खडसे यांनी चौकशीला येणं टाळलं
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे  हे अंमलबजावणी संचालनालय  कार्यालयात जाणार नाहीत. एकनाथ खडसे यांनी स्वत:च ट्विटरवरुन याबाबत खुलासा केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून आपल्याला समन्स प्राप्त झाले होते. त्यानुसार आज ईडी  कार्यालयात जाणारच होतो. परंतू, आरोग्याबाबत तक्रारी असल्याने डॉक्टरांनी १४ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे १४ दिवसानंतर पुन्हा ईडी कार्यालात उपस्थित राहणार आहे. आपण ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः- मध्य रेल्वे मार्गावर 'चिखलोली' नवा थांबा

खडसे यांनी ऑक्टोबर महिन्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्याला ईडी लावली, तर आपण सीडी लावू, असे म्हटले होते. त्यानंतर आता दोन महिन्यानंतरच ईडीने मनी लाँडरींगप्रकरणी त्यांना समन्स बजावले होते. भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री  आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना समन्य बजावले होते. तर, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून त्यासाठी ३० डिसेंबर मुंबईला जाणार आहोत, तसेच  आपण ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केले. मात्र बुधवारी त्यांना थंडी, ताप, सर्दी आणि थोडा खोकला येऊ लागला. ही कोरोनाची लक्षणं असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र त्यांना १४ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आपण ईडी कार्यालयात १४  दिवसांनी हजर राहू असं खडसेंनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचाः- आयटी रिटर्न भरण्याची मुदत आणखी वाढवली, 'ही' आहे अंतिम तारीख

 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) २०१७ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करत आहे. भोसरी येथील जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुण्यातील एका व्यावसायिकाने केला होता. तक्रारीनुसार या जमीनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांमध्ये खडसेंच्या कुटुंबियांना विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.२०१८ मध्ये एसीबीने केलेल्या तपाात खडसे यांना क्लीनचीट देण्यात आली होती. त्यावेळी सरकारने एक समिती स्थापन करून तिच्या माध्यमातूनही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ईडी आता याप्रकरणी मनी लाँडरींगप्रकरणी झाली आहे का, याबाबत तपास  करणार आहे. गुन्ह्यांत सहभागी मालमत्तेतील काळा पैसा पुन्हा बाजारात फिरवण्यात आल्याबाबत तपास करण्याचा अधिकार ईडीला आहे. जून्या गुन्ह्यांच्या आधारावर प्रोव्हीजन ऑफ द प्रीव्हेंन्शन ऑफ मनी लाँडरींग अंतर्गत ईडी अशा प्रकरणात तपास करते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा