Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

निवडणुका संपल्या, आता मोदी सरकारची लाॅकडाऊनवर भूमिका काय?- नवाब मलिक

लाॅकडाऊनवर मोदी सरकारची नेमकी भूमिका काय आहे, लसीकरणाच्या किंमतीचं काय करायचं? याचं उत्तर लोकांना हवं आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं.

निवडणुका संपल्या, आता मोदी सरकारची लाॅकडाऊनवर भूमिका काय?- नवाब मलिक
SHARES

देशातल्याा चार राज्यातील निवडणुका संपलेल्या आहेत. आता लाॅकडाऊनवर मोदी सरकारची नेमकी भूमिका काय आहे, लसीकरणाच्या किंमतीचं काय करायचं? याचं उत्तर लोकांना हवं आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात लाॅकडाऊन लावण्याची गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता त्यांची काय भूमिका आहे? लसींच्या किंमतीपासून ते लसीकरणापर्यंत सर्वसामान्यांच्या मनात अनेक गोंधळ आहे, सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला यावर विचारणा केलेली आहे. आता तर निवडणुका देखील संपलेल्या आहेत, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे. 

हेही वाचा- ‘त्या’ पक्षाने खबरदार राहावं, अदर पुनावाला प्रकरणावरून शेलारांचा इशारा

एकटे पंतप्रधान मोदी कोरोनाच्या संकटाशी लढू शकत नाही. तेव्हा त्यांनी देशात हेल्थ इमर्जन्सी लागू करावी. देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवावी आणि त्यात कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी रणनिती ठरवावी, अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी केली.

सोबतच सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या धमकी प्रकणावर बोलताना, देशात सीरम आणि भारत बायोटेकला लस निर्मितीचं लायसन्स देण्यात आल्यानंतर कोण त्यांना बदनाम करण्यासाठी कटकारस्थान करत होतं याचा शोध त्यांनी लावला पाहिजे. जनजागृती झाल्याने लोकं मोठ्या संख्येने लस घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे लशींची उत्पादनक्षमता वाढवणं ही काळाची गरज निर्माण झाली आहे. सरकारबरोबर लस उत्पादक कंपन्यांची देखील ही जबाबदारी आहे. 

पुनावाला यांनी केंद्राला दीडशे, राज्याला आधी ४०० रुपये नंतर स्वतःच ट्विट करून ३०० रुपये दर जाहीर केला. हा सगळा प्रकार जनतेच्या मनात संशय निर्माण करणारा आहे. मात्र त्यांना कोणीही बदनाम करत नसल्याचं मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं. 

(ncp leader nawab malik asks pm narendra modi over lockdown and covid 19 vaccination)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा