Advertisement

शिवसेना ही आज लाचारसेना झाली आहे - नवाब मलिक

कालपर्यंत अफझलखानाच्या फौजा उतरल्या होत्या आणि आज शिवसेना लाचारासारखी गुजरातमध्ये गेली. शिवसेना ही आता लाचार सेना झाली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

शिवसेना ही आज लाचारसेना झाली आहे - नवाब मलिक
SHARES

कालपर्यंत भाजपाला  अफझलखानाची उपमा देणारी शिवसेना आज लाचारांसारखी गुजरातमध्ये गेली. त्यामुळे शिवसेना ही लाचार सेना झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुजरातमध्ये गेले. त्यांच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी कडाडून टीका केली.


सेनेचं लोटांगण

शिवसेनेनं भाजपासमोर अक्षरशः लोटांगण घातलं आहे. हे त्यांच्या जाण्यानं समोर आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. कालपर्यंत गांधीनगरमध्ये कुणीही प्रचाराला यायचं नाही ही भाजपची भूमिका राहिली होती. परंतु आज अर्ज भरताना अमित शहांनी सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना बोलावून घेतलं यावरुन अमित शहा अडचणीत आहेत, हे स्पष्ट होतं असंही नवाब मलिक म्हणाले.


आयोगाचं म्हणणं अयोग्य

यापूर्वी बॅलेट पेपरवर निवडणुकीचा निकाल १२ ते १४ तासांत येत होता आणि आता ६ दिवस लागतील हे निवडणूक आयोगाचं म्हणणं योग्य नाही, असं मत मलिक यांनी व्यक्त केलं. काँग्रेस आणि अन्य २१ विरोधी पक्षांनी ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली. 

निवडणूक आयोगाने ५० टक्के व्हीव्हीपॅट मोजण्यासाठी ६ दिवस लागतील असं न्यायालयात सांगितलं. निवडणूक आयोगाचा हा दावा मान्य नसल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं. याबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. परंतु निवडणूक आयोग जी भूमिका मांडत आहे ती योग्य नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा -

शालिनी ठाकरेंकडून उर्मिला मातोंडकरला ‘मनसे’ शुभेच्छा

मतदान, मतमोजणी दरम्यान ३ दिवस 'ड्राय-डे'संबंधित विषय
Advertisement