भाजपने दुहीची बिजे पेरली- जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्यासाठी एकी महत्वाची असताना महाराष्ट्रद्रोही भाजपने आंदोलन करून दुहीची बीजे पेरली.

भाजपने दुहीची बिजे पेरली- जितेंद्र आव्हाड
SHARES

महाराष्ट्र कोरोना संकटाशी (coronavirus) मुकाबला करत असताना महाराष्ट्र बचाव तसंच मेरा आंगण-मेरा रणांगण आंदोलन करून ठाकरे सरकारचा (maha vikas aghadi government) निषेध करणाऱ्या भाजपने महराष्ट्रात दुहीची बिजे पेरल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी शनिवारी केला.

आरोग्य व्यवस्था कोलमडली

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून शासन निष्क्रीय झालं आहे. या संकटाच्या काळात विरोधी पक्ष म्हणून भाजपने (maharashtra bjp) सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली, परंतु महाविकास आघाडी सरकार विरोधी पक्षाला विश्वासात न घेताच चुकीचे निर्णय घेत सुटलं आहे. यामुळे जनता तरी आता किती सहन करणार? असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला जागं करण्यासाठी भाजपने शुक्रवार २२ मे रोजी महाराष्ट्र बचाव आंदोलन (protest) केलं. या आंदोलनात राज्यभरातील भाजप नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

हेही वाचा - शासन निष्क्रीय, जनता किती सहन करणार?- देवेंद्र फडणवीस

५० हजार कोटी द्या

राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपाचे हे आंदोलन सरकारला जागं करण्यासाठी आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० हजारांवर गेली आहे. केवळ रूग्णवाहिका नाही, म्हणून अनेकांचे मृत्यू होत आहेत. आरोग्यसेवेकडे अजूनही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील. लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी, १२ बलुतेदार आणि असंघटीत कामगारांना ५० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषण सरकारने करावी, अशी मागणी या आंदोलनात सहभागी झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्यासाठी एकी महत्वाची असताना महाराष्ट्रद्रोही भाजपने आंदोलन करून दुहीची बीजे पेरली. जनता हे विसरणार नाही आणि माफही करणार नाही.  

संबंधित विषय