Advertisement

जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंशी पाऊण तास चर्चा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपासाठी वाटाघाटी सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होत अाहे. या बैठकील जाण्याअाधी अाव्हाड यांनी उद्धव यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचविल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंशी पाऊण तास चर्चा
SHARES

 राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चक्क शुक्रवारी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण अालं अाहे. या भेटीत जवळपास दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. मात्र, ही भेट नेमकी कशासाठी होती हे अद्याप गुलदस्त्यातच अाहे. अाव्हाड यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं ट्विट करून सांगितलं अाहे.



बैठकीअाधी भेट

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्यास सुरूवात झाली अाहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे नेते एकमेकांच्या गाठीभेटी घेत अाहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपासाठी वाटाघाटी सुरू आहेत.  शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होत अाहे. या बैठकील जाण्याअाधी अाव्हाड यांनी उद्धव यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचविल्या आहेत.

काँग्रेसवर दबावासाठी?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सायंकाळी जागा वाटपाबद्दल चर्चा होणार आहे. आघाडी असो वा युती प्रत्येक पक्ष आपल्या पदरात जास्त जागा मिळविण्यासाठी दबाव तंत्र अवलंबत असतो. वेळोवेळी शिवसेना भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत अाहे. तर काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी ही भेट नसेल ना असा प्रश्न उपस्थित होत अाहे.



हेही वाचा -  

पीडित महिलेला नेहमीच चांगली वागणूक दिली; गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा खुलासा

तनुश्री दत्ताला महिला काँग्रेसचा पाठिंबा; ओशिवरा पोलीस ठाण्यावर मोर्चा




 .

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा