Advertisement

पीडित महिलेला नेहमीच चांगली वागणूक दिली; गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा खुलासा

ही घटना घडली त्यावेळी दालनात २५ ते २५ लोक मला भेटण्यासाठी अाले होते. त्यांनी सर्व वस्तुस्थिती बघितली अाहे. मी प्रत्येक वेळा या महिलेला चांगली वागणूक दिली अाहे

पीडित महिलेला नेहमीच चांगली वागणूक दिली; गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा खुलासा
SHARES

सामुहिक बलात्कारप्रकरणी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे दाद मागण्यास गेलेल्या एका पीडित महिलेला केसरकर यांनी अर्वाच्च भाषेत अपमानीत करत मंत्रालयातील दालनाबाहेर काढल्याचं वृत्त बुधवारी मुंबई लाइव्हने दिलं होतं. मात्र, असं काही घडलं नसल्याचा दावा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर खुलासा करून केला अाहे.

 या पीडित महिलेने तिचा पती अाणि मुलांसह महिन्यात २ ते ३ वेळा भेटून अापलं म्हणणं मांडलं. यावेळी मी स्वतः ठाणे जिल्हा पोलिस अधिक्षक यांना दूरध्वनी करून या प्रकरणी गांभिर्याने चौकशी करण्याच्या सूचना केल्या, असं केसरकर यांनी म्हटलं अाहे.  


महिलांचा मान ठेवतो 

पीडित महिला बुधवारी पुन्हा पती व मुलीसह भेटली. यावेळी ठाणे जिल्हा पोलिस अधिक्षकांना पुन्हा फोन करून महिलेच्या तक्रारीसंदर्भातील सर्व कागदपत्रांसह मंत्रालयात येऊन चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी महिलेच्या पतीने ठाणे पोलिस अधिक्षक अाणि पोलिसांबाबत असभ्य व अवमानकारक भाषा वापरली. मी हस्तक्षेप करत मी महिलांचा मान ठेवतो अाणि तुम्हाला न्याय देण्यासाठी पोलिस अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला मंत्रालयात बोलावून चर्चा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं महिलेला सांगितलं. त्यांना अपमानीत करून बाहेर काढण्यात अालं नाही.

 ही घटना घडली त्यावेळी दालनात २५ ते २५ लोक मला भेटण्यासाठी अाले होते. त्यांनी सर्व वस्तुस्थिती बघितली अाहे. मी प्रत्येक वेळा या महिलेला चांगली वागणूक दिली अाहे. तसंच त्यांचं म्हणणं एेकून घेऊन अावश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या अाहेत, असं केसरकर यांनी अापल्या खुलाशात म्हटलं अाहे. 



हेही वाचा -

Exclusive: बलात्कार पीडित महिलेचा अपमान, गृहराज्यमंत्री केसरकरांविरोधात पोलिसांत तक्रार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा