Advertisement

तनुश्री दत्ताला महिला काँग्रेसचा पाठिंबा; ओशिवरा पोलीस ठाण्यावर मोर्चा

तनुश्रीवर चित्रिकरणावेळी जो अत्याचार झाला, त्याबाबत तिने दहा वर्षानंतर तक्रार दाखल केली. तिची सुरू असलेली घुसमट आता बाहेर पडली. इतकी वर्षे ती या यातना सहन करत होती.

तनुश्री दत्ताला महिला काँग्रेसचा पाठिंबा;  ओशिवरा पोलीस ठाण्यावर मोर्चा
SHARES

अभिनेत्री तनुश्री दत्ताला समर्थन देत अभिनेते नाना पाटेकर यांच्यासहीत अन्य तीन जणांना लवकरात लवकर अटक करावी  या मागणीसाठी गुरूवारी मुंबई महिला काँग्रेसने ओशिवरा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ. अजंता यादव यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.


घुसमट बाहेर पडली

तनुश्री दत्ता हिने दहा वर्षानंतर अत्याचाराला वाचा फोडली. तिच्या या धाडसाला आम्ही सलाम करतो,  असं म्हणत अजंता यादव यांनी तनुश्रीचं कौतुक केलं. यावेळी त्या म्हणाल्या, तनुश्रीवर चित्रिकरणावेळी जो अत्याचार झाला, त्याबाबत तिने दहा वर्षानंतर तक्रार दाखल केली. तिची सुरू असलेली घुसमट आता बाहेर पडली. इतकी वर्षे ती या यातना सहन करत होती. आम्ही ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवर आणि महिला आयोगाच्या प्रमुख विजया रहाटकर यांची भेट घेतली अाहे.


हेल्पलाईन हवी

 कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाची तक्रार करण्यासाठी एक कमिटी नेमावी आणि एक हेल्पलाईन उपलब्ध करावी. महिलेवर अत्याचार करणारा मोठी व्यक्ती असली तरी त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे, असं यावेळी यादव म्हणाल्या.



हेही वाचा- 

नाना पाटेकर, गणेश आचार्यसह दिग्दर्शक, निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल

तनुश्रीच्या तक्रारीची दखल, महिला आयोगानं नानाला बजावली नोटीस




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा