Advertisement

आव्हाड पुन्हा एकदा मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तासभर चर्चा

जितेंद्र आव्हान यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. ही भेट सुमारे तासभर चालली. या आधी आव्हाड यांनी १२ आॅक्टोबरला उद्धव यांची भेट घेतली होती.

आव्हाड पुन्हा एकदा मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंसोबत तासभर चर्चा
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हान यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. ही भेट सुमारे तासभर चालली. या भेटीत त्यांनी उद्धव यांना आपल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं निमंत्रण दिल्याचं म्हटलं जात आहे.


आधीही भेट

या आधी आव्हाड यांनी १२ आॅक्टोबरला उद्धव यांची भेट घेतली होती. तेव्हा या दोघांमध्ये पाऊणतास चर्चा झाली होती. या भेटीचं कारण समोर आलं नसल्याने या भेटीवरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.


तर्कवितर्कांना उधाण

आव्हाड हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जवळचे समजले जातात. भाजपाचा पराभव करायचा असल्यास सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे, असं पवार यांचं म्हणणं आहे. याच भूमिकेतून शिवसेनेशी जवळीक करण्यासाठी आव्हाड यांनी ही भेट तर घेतली नाही ना? यावरही चर्चा सुरू होत्या.

त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र कुठल्याही परिस्थितीत शिवसेना महाआघाडीत येणार नाही, असं म्हटलं आहे.हेही वाचा-

'वन खात्याचं नाव बदलून शिकार खातं करा’, आदित्य ठाकरेंची वनविभागावर टीका

जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंशी पाऊण तास चर्चाRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा