Advertisement

“गुजरातमधल्या ५ वी नापास आमदारासारखं रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही”

कोविडमुळं खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, तर त्यात गैर काय?

“गुजरातमधल्या ५ वी नापास आमदारासारखं रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही”
SHARES

कोविड सेंटरमध्ये पीपीई किट घालून डान्स केल्याबद्दल भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करण्यात येत असताना पवार यांनी देखील पलटवार केला आहे. कोविडमुळं खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, तर त्यात गैर काय? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील कोविड केअर सेंटरला सोमवारी भेट दिली. या भेटीत त्यांना कोविड संदर्भातील प्रोटोकाॅलचं पालन करता चक्क रुग्णांसोबत ‘झिंगाट’ गाण्यावर डान्सही केला. यावर टीका करताना शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का? असा प्रश्न भाजप (bjp) आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विचारला.

त्याला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, सन्माननीय प्रविण दरेकरजी कोविड सेंटरमधली माणसं माझ्या कुटुंबातली असून त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहे. त्यामुळं शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो असं नाही तर नेहमीच भेटतो.

हाच माझ्यासाठी आनंद

माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिकही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात. कोविडमुळं खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटं सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे.

हेही वाचा- शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का?- प्रविण दरेकर

आणि हो... ५ वी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखं मी रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही. तसंच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेंव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचंही काही दिसलं नाही! असं का?, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.

त्यावर जे चूक, ते चूकच

जे चूक, ते चूकच असते. मग तो कोणीही असो! दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना आपल्याकडे चार बोटे असतात, एवढंच 'रोहित' जी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. तुम्ही, मतदारसंघातील सर्वांना कुटुंब समजून आपण त्यांची सेवा करता, हे उत्तमच! त्याविषयी आक्षेप किंवा शंका नाही. आपल्या चांगल्या कामाबद्दल कौतुकच आहे. पण, नियम हा सर्वांसाठी सारखाच असतो. मग तो तुमच्या पक्षाचा नेता असो वा अन्य कोणत्या! राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी,अधिकारी रुग्णांची जमेल तशी सेवा करीत आहेतच. रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होणं, ही तुमच्या माझ्यासारख्यांसाठी आनंदाची पर्वणीच ठरेल, असं प्रविण दरेकर यांनी नोंदवलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा