Advertisement

एवढाच अभ्यास असेल, तर मदत करायला कुणी अडवलं? रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

सध्याच्या घडीला परिस्थिती हाताळायला अभ्यासू आणि अनुभवी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) असायला पाहिजे होते, असं ट्विट करणारे भाजपचे नेते निरंजन डावखरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी चांगलंच सुनावलं आहे.

एवढाच अभ्यास असेल, तर मदत करायला कुणी अडवलं? रोहित पवारांनी भाजपला सुनावलं
SHARES

सध्याच्या घडीला परिस्थिती हाताळायला अभ्यासू आणि अनुभवी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) असायला पाहिजे होते, असं ट्विट करणारे भाजपचे नेते निरंजन डावखरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी चांगलंच सुनावलं आहे. तुमचा एवढाच अभ्यास आणि अनुभव असेल, तर मदत करायला कुणी अडवलं आहे, असं म्हणत पवार यांनी भाजप नेत्याच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हेही वाचा - नाहीतर महाराष्ट्रात खराखुरा कर्फ्यू लागू करा, मनसेची मागणी

कोरोनामुळे महाराष्ट्रावर मोठं संकट कोसळलेलं असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) या संकटातून बाहेर येण्यासाठी अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी या दोघांसह राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ कडक उपायोजना करण्यात गुंतलं आहे. खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री गंभीर आजाराला तोंड देत असताना टोपे मात्र राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. 

आशा बिकट समयी विरोधी बाकांवर असूनही एकत्र येऊन काम करणं अपेक्षित असताना भाजप नेते निरंजन डावखरे (niranjan davkhare) यांनीही इथंही राजकारण करण्याची संधी सोडलेली नाही. सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे, असं ट्विट करत डावखरे यांनी नेटकऱ्यांचा रोष स्वत:वर ओढावून घेतला.

हेही वाचा - म्हणे, सध्या महाराष्ट्राला फडणवीसांची गरज, डावखरेंच्या ट्विटवर नेटिझन्स भडकले

त्याला उत्तर देताना आमदार रोहित पवार (ncp mla rohit pawar) यांनी, राजकारण आम्हालाही करता येतं, पण आज ती वेळ नाहीय. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण 'होम क्वारंटाईन' करा. तुमचा एवढा 'अभ्यास' व अनुभव असेल तर मदत करायला तुम्हाला अडवलं कुणी? असा प्रश्न विचारत खडे बोल सुनावले आहेत.    


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा