Advertisement

सनातनवर तात्काळ बंदी घाला - नवाब मलिक


सनातनवर तात्काळ बंदी घाला - नवाब मलिक
SHARES

केंद्र अाणि राज्यातील भाजप सरकारचा सनातन संस्थेला राजाश्रय असल्याने साधकांच्या हिंसक कारवाया वाढल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला अाहे. सनातन संस्थेवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली अाहे.


गोवा, महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय

 महाराष्ट्र एटीएसने शुक्रवारी नालासोपारामधून सनातन संस्थेच्या साधकाला बॉम्ब आणि बॉम्बच्या साहित्यासहीत अटक केली अाहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांना सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली अाहे. सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी वारंवार मागणी करण्याची अाली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सनातन संस्थेला गोवा आणि महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय मिळत आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. सनातन संस्थेला अजून किती लोकांची हत्या करायची आहे. त्यांचा आणखी कोणता कट आहे, याची माहिती घ्यावी आणि सरकारने हा विषय गंभीरतेने घेऊन तात्काळ या संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी असं नवाब मलिक यांनी म्हटलं अाहे. हेही वाचा - 

नालासोपाऱ्यात 8 देशी बॉम्ब जप्त, मुंबई एटीएसची कारवाई

'राम मंदिर जरूर बांधा' पण त्याआधी 'हे' करा! - मनसे
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा