Advertisement

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचं मातोश्रीबाहेर आंदोलन; उद्धव ठाकरेंचा निषेध

शरद पवारसाहेब हे संपूर्ण देशाचे नेते असून त्यांच्याबद्दल असं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुरेखा पेडणेकर यांनी केली.

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचं मातोश्रीबाहेर आंदोलन;  उद्धव ठाकरेंचा निषेध
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसने निषेध केला अाहे. मंगळवारी मातोश्रीबाहेर मुंबईतील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी या महिलांनी उद्धव ठाकरे यांना गुडघ्याची कॅप आणि प्रतिकात्मक वाघ भेट देऊन अापला निषेध नोंदवला.

उद्धव यांनी माफी मागावी

सध्या काहीजण महापुरुषांच्या पगडीचं राजकारण करत आहेत. असं राजकारण करणाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी केली होती. उद्धव यांच्या या वक्तव्याचा निषेध करत मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आणि मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. शरद पवारसाहेब हे संपूर्ण देशाचे नेते असून त्यांच्याबद्दल असं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुरेखा पेडणेकर यांनी केली.  


शिवसेनेच्या वाघाचं मांजर 

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा मोठा वटवृक्ष उभा केला आहे. तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना वारसा हक्काने मिळाली असून ती त्यांना नीट चालवता येत नाही, असा टोला मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांनी यावेळी लगावला. तसंच उद्धव यांचा गुडघ्यातील मेंदू शाबूत राहावा यासाठी आम्ही त्यांना गुडघ्याची कॅप दिली अाहे. तर शिवसेनेच्या वाघाचं सध्या मांजर झालं असून तो वाघ पुन्हा शाबूत रहावा म्हणून प्रतिकात्मक वाघ भेट दिल्याचं अदिती नलावडे यांनी सांगितलं.  या आंदोलनात उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षा बिलकिश आपा, सुरेना मल्होत्रा, डॉ.रिना मोकल, अनिता थोरात, स्वाती माने, युवक तालुकाध्यक्ष राकेश धिलोड आणि पदाधिकारी उपस्थित होते.



हेही वाचा -

गोवारी समाज आदिवासी!, मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

‘मी मुख्यमंत्री’ नव्हे तर ‘मी घोटाळेबाज बोलतोय’- सचिन सावंत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा