Advertisement

“अजित पवार मराठवाडा-विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यास दगड मारून स्वागत केलं पाहिजे”

अजित पवार मराठवाडा - विदर्भात आले तर त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून त्यांचं स्वागत केलं पाहिजे, असं वक्तव्य करत भाजप नेते निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

“अजित पवार मराठवाडा-विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यास दगड मारून स्वागत केलं  पाहिजे”
SHARES

विदर्भ - मराठवाड्याच्या निधीवरून सोमवारी विधिमंडळात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधान परिषदेवर १२ आमदारांची नियुक्ती झाल्यानंतर लगेच वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना करण्यात येईल, असं अजित पवार यांनी म्हणताच हा विरोधकांनी एकच गदारोळ केला. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार मराठवाडा - विदर्भात आले तर त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून त्यांचं स्वागत  केलं पाहिजे, असं वक्तव्य करत भाजप (bjp) नेते निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.   

१२ आमदार जाहीर होतील तेव्हा वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना करू, असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा विदर्भात आले तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे. १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

हेही वाचा- “आम्ही भिकारी नाही”, अजित पवारांवर फडणवीस संतापले

वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना ७२ दिवस झाले तरी सरकारने केलेली नाही. विदर्भ, मराठवाड्यातील जनताही महाराष्ट्रातील आहे हे लक्षात‌ ठेवावं. राजकीय डावपेचात वैधानिक विकास मंडळ अडकता कामा नये. या सभागृहात मला कोरोना होणार नाही म्हणून बसायचं आहे की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बसायचं आहे? हे ठरवावं. अजित पवार ७२ दिवसांपूर्वी दिलेलं आश्वासन पूर्ण करणार आहेत की नाही एवढंच सांगावं,असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपस्थित केला.

त्यावर,आम्ही वैधानिक विकास महामंडळ स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. या महामंडळांसाठी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करू. मात्र मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे. तो असा की ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करण्यात येतील त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु, असं सडेतोड उत्तर अजित पवार (ajit pawar) यांनी दिलं. 

(nilesh rane slams ajit pawar on maharashtra assembly budget session statement)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा