Advertisement

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफिसाठी ठोस आश्वासन नाही'


'शेतकऱ्यांच्या कर्जमाफिसाठी ठोस आश्वासन नाही'
SHARES

मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मंत्री आणि भाजपाचे आमदार थेट दिल्लीत पोहोचले. शिष्टमंडळाने अर्थमंत्री अरुण जेटली आणि कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेतली. या दोघांसोबत 20 मिनिटे बैठक झाली. मात्र काहीही सकारात्मक आश्वासन मिळाले नाही.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस योजना आणली जाणार आहे, असे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले. तर मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकारांना माहिती दिली की, राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतच्या सर्व जबाबदाऱ्या केंद्र सरकारवर टाकणार नाही. केंद्राकडून यासंदर्भात तयार करण्यात येणाऱ्या योजनेत राज्य सरकार स्वत:च्या स्रोतांमधून काही प्रमाणात सहभाग देण्यास तयार आहे. उर्वरित जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारावी. या तत्त्वानुसार केंद्र सरकारने तयार केलेली योजना राज्य सरकार स्वीकारेल. मात्र या भेटीनंतर शिवसेनेचे सदस्य नाराज दिसत होते. भेटीबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, शिवसेनेला योजना नको, फक्त कर्जमाफी हवी आहे. उद्धव ठाकरे यांना या बैठकीची माहिती देण्यात येणार आहे. नवी दिल्लीत बैठक झाल्यानंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री मंत्रीमंडळाची बैठक घेतली.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा