Advertisement

भुजबळांना शिवसेनेत ‘नो एण्ट्री’- संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कुठल्याही परिस्थितीत भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

भुजबळांना शिवसेनेत ‘नो एण्ट्री’- संजय राऊत
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ लवकरच शिवसेनेत प्रवेश घेतील, या चर्चांनी सध्या जोर पकडलेला आहे. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कुठल्याही परिस्थितीत भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. 

उद्धव यांचाही खुलासा

भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश मिळण्याच्या शक्यतेने नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी अस्वस्थ झाले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्री गाठून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच विनंती केली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भुजबळ यांनी दिलेला त्रास आम्ही आजही विसरलेलो नाही. त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली होती. तेव्हा उद्धव यांनी भुजबळ यांना पक्षात प्रवेश देण्यात येणार नाही, असा खुलासा केला होता. 

हेही वाचा- अन् शरद पवार भडकले, पत्रकार परिषद सोडून चालू लागले

आहे तिथं बरा

या चर्चांवर मी आहे तिथं बरा असल्याचा खुलासा भुजबळांनी केला असला, तरी  येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघातील विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या भुजबळांना विंचूर येथील शिवसैनिकांनी भेटून शिवसेनेत प्रवेश करण्याचं साकडं घातलं आणि भगवी शाल देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे शिवसैनिकांच्या गोंधळात आणखी भर पडली. 

राणेंना विरोध नाही

त्यातच येवला मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राऊत यांची भेट घेत भुजबळांना पक्षात प्रवेश देण्यात येऊ नये, अशी विनंती केली. त्यावर कुठल्याही परिस्थितीत भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, असं आश्वासन राऊत यांनी दिलं. तसंच राणेंना भाजपमध्ये प्रवेश द्यावा किंवा नाही हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

साहेबांवर बोट दाखवणारे डबल ढोलकी- राेहीत पवार

राष्ट्रवादीचं ‘भुज’बळ जाणार? सुप्रिया सुळेंच्या सूचक वक्तव्यामुळे चर्चा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा