Advertisement

‘मास्क नाही, प्रवेश नाही’ उपक्रम राज्यभर राबवा- उद्धव ठाकरे

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम राज्यभर राबवायला हवा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मास्क नाही, प्रवेश नाही’ उपक्रम राज्यभर राबवा- उद्धव ठाकरे
SHARES

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या जनजागृती मोहिमेचा गौरव केला. पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. (no face mask no entry initiative must follow in all maharashtra orders cm uddhav thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत जनतेचा सहभाग वाढवावा. ही मोहीम लोकचळवळ व्हावी. यातून महाराष्ट्र आरोग्यसंपन्न व्हावा यासाठी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे  यासाठी नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती होणे गरजचं आहे. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, असा अभिनव उपक्रम कोल्हापूरने सुरु केला आहे. हा उपक्रम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे हा उपक्रम राज्यभर राबवायला हवा.

हेही वाचा - कोरोनाविरुद्ध ‘हाच’ महत्त्वाचा मंत्र- उद्धव ठाकरे

काही लोकांच्या बेपर्वाईमुळे संसर्ग वाढत आहे. यासाठी गृह विलगीकरण आणि गृह अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरणार नाहीत याची दक्षता घ्या. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतून नागरिकांच्या तपासणीबरोबरच त्यांना आरोग्य शिक्षण मिळणं गरजचं आहे. निरोगी महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी या मोहिमेत सर्वांनी सक्रीय व्हावं. जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोरोना रुग्णांना लागणारा आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी टँकर उपलब्ध करुन देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.  कोल्हापूर जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. घरोघरी आरोग्य पथकामार्फत नागरिकांची तपासणी केली जात आहे. या मोहिमेतून इली व सारीच्या रुग्णांची माहितीही संकलित केली जात आहे. जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून सुमारे एक कोटीचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या नजिकच्या जिल्ह्यासह सीमा भागातून उपचारासाठी रुग्ण येत आहेत. त्यामुळे फिजिशिएन उपलब्ध व्हावेत. एनआयव्ही, एचएफएन खाटांची क्षमता वाढवून ठेवावी लागेल. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून आवश्यक असणारा एसडीआरएफमधील निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

हेही वाचा - महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जातोय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा