Advertisement

उर्मिलाच नाही, तर ‘हे’ बाॅलिवूड कलाकारही राजकारणाला कंटाळले!

राजकारणात सध्या अनेक सेलिब्रिटी आपलं नशीब आजमावून बघत असले, त्यापैकी काहींना अच्छे दिन आले असले, तरी काही बाॅलिवूड ताऱ्यांना राजकारणाने जमिनीवर आपटलेलंही आहे. चला राजकारणाने हिसका दिलेल्या कलाकारांवर नजर टाकूया...

उर्मिलाच नाही, तर ‘हे’ बाॅलिवूड कलाकारही राजकारणाला कंटाळले!
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये दाखल झालेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने अवघ्या ६ महिन्यांत काँग्रेसला रामराम ठोकला. उर्मिला आता शिवसेनेत दाखल होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असताना ‘मी कुठल्याही पक्षात जात नाहीय’, असा खुलासा करत उर्मिलाने या चर्चांना पूर्णविराम दिला. राजकारणात सध्या अनेक सेलिब्रिटी आपलं नशीब आजमावून बघत असले, त्यापैकी काहींना अच्छे दिन आले असले, तरी काही बाॅलिवूड ताऱ्यांना राजकारणाने जमिनीवर आपटलेलंही आहे. चला राजकारणाने हिसका दिलेल्या कलाकारांवर नजर टाकूया...

अमिताभ बच्चन : अमिताभ बच्चन आणि देशाचे माजी पंतप्रधान तसंच काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांची मैत्री जगजाहीर आहे. या दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की कधी कधी राजीव गांधी अमिताभला भेटायला सिनेमाच्या सेटवरही पोहोचायचे. राजीव गांधी यांनीच अमिताभ यांना राजकारणात प्रवेश करण्यास प्रोत्साहीत केलं होतं, असं म्हणतात. 

सन १९८४ साली अमिताभ बच्चन काँग्रेसचे उमेदवार म्हणून इलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र अमिताभ यांचं राजकीय करिअर खूपच छोटं ठरलं. कारण बोफोर्स घोटाळ्यात नाव आल्याने त्यांना अवघ्या ३ वर्षांत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. एवढंच नाही तर त्यांना राजकारणातूनही कायमचा संन्यास घ्यावा लागला.  

गोविंदा : नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याने देखील राजकारणात आपलं नशीब आजमावलं. गोविंदा २००४ साली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर राजकारणाच्या रिंगणात उतरला होता. त्याने भाजपाचे मातब्बर नेते राम नाईक यांना या निवडणुकीत मोठ्या फरकाने हरवलं. असं असूनही त्याला राजकारणात दिर्घकाळ आपलं स्थान टिकवून ठेवता आलं नाही. 

निवडणूक लढताना गोविंदाने मुंबईतला जिकरीचा प्रवास, आरोग्य, शिक्षण या विषयांवर मुंबईकरांना असंख्य आश्वासनं दिली होती. परंतु यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता करण्यात गोविंदाला यश आलं नाही. त्यामुळे मतदारही त्याच्यावर नाराज झाले. अखेर आपली ५ वर्षांची टर्म पूर्ण करताच त्याने २००९ ची निवडणूक लढवण्याच्या भानगडीत न पडता पुन्हा एकदा आपलं लक्ष चित्रपटांकडे केंद्रीत केलं.  

राजेश खन्ना : बाॅलिवूडमधील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी देखील राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राजकारणात ते सुपरफ्लाॅप ठरले. १९९१ मध्ये त्यांनी दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर भाजपाचे फायरब्रँड नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा फटका सहन करावा लागला. १९९२ मध्ये याच जागेवरील पोटनिवडणुकीत राजेश खन्ना यांनी भाजपाचे शत्रुघ्न सिन्हा यांना हरवलं. १९९६ पर्यंत ते राजकारणात कार्यरत होते. परंतु त्यांनाही राजकारण फारसं न रुचल्याने त्यांनी काढता पाय घेतला. 

धर्मेंद्र : भाजपाचं जोरदार कॅम्पेनिंग आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची स्टार पाॅवर याच्या जोरावर प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र भाजपाच्या तिकीटावर बिकानेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. भलेही त्यांचा विजय एकतर्फी झाला असला, तरी त्यांचंही मन फारकाळ राजकारणात रमलं नाही. त्यामुळे आपली टर्म संपताच त्यांनीही राजकारणाला रामराम ठोकला.

शेखर सुमन : मोठ्या पडद्यावरील अभिनयापेक्षा लहान पडद्यावरील सूत्रसंचालक, जज म्हणून लोकप्रिय झालेले अभिनेते शेखर सुमन यांनी देखील निवडणूक लढवली होती. २००९ मध्ये बिहार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या शेखर सुमन यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठ्या फरकाने हरवलं होतं.   



हेही वाचा -

मनसेचंही ठरलं, १०० जागा लढवणार?

उर्मिला शिवसेनेच्या वाटेवर? कारण काय?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा