'काळा पैसा पुन्हा चलनात येतोय'

 Vidhan Bhavan
'काळा पैसा पुन्हा चलनात येतोय'

नरिमन पॉईंट - काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटाबंदीच्या मुद्द्यावरून टीका केलीय. काळा पैसा पुन्हा बँकेच्या माध्यमातून चलनात आणला जातोय. हा काळा पैसा कुणाचा आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी केलाय. बँकेत जो काळा पैसा जमा झाला त्याची चौकशी करण्यासाठी न्यायिक समिती नेमावी, अशी मागणीही सिब्बल यांनी केली.

नोटाबंदीनंतर भारतात मोठा भ्रष्टाचार झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र याबाबत गप्प आहेत. या नोटाबंदीचा फायदा भाजपाला झाला. त्यामुळे याची चौकशी व्हावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केलीय.

Loading Comments