Advertisement

प्रार्थनास्थळं सुरू करा! आता रामदास आठवले आंदोलन छेडणार

धार्मिक स्थळं खुली करण्याच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आहे.

प्रार्थनास्थळं सुरू करा! आता रामदास आठवले आंदोलन छेडणार
SHARES

राज्यभरातील प्रार्थनास्थळं सुरू करा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता याच मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आहे. (open all religious places in maharashtra demands rpi chief ramdas athawale)

दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मंदिर, मस्जिद, चर्च, देरासर, गुरुद्वारा, बुद्ध विहार अशा सर्व धर्मियांची धार्मिक स्थळं ८ सप्टेंबरपर्यंत खोलण्यात यावीत. कोरोना संकटासंबंधित नियमांचं पालन व्हावं यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रामदास आठवले यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

हेही वाचा - वंचितने हिंदुत्व स्वीकारलं का? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्यात यावीत, या मागणीसाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर वंचित बहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो वारकऱ्यांनी आंदोलन केलं. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आठवड्याभरात धार्मिक स्थळं सुरू करण्यात येतील, असं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

कोरोनाच्या आजारातून ८५ टक्के रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे या आजाराला घाबरण्याची गरज नसून केवळ काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आंदोलनासाठी जमलेल्या लोकांनी नियम मोडल्याचं म्हटलं जात आहे. परंतु नियम मोडण्यासाठीच आम्ही हे आंदोलन केलं आहे. सार्वजनिक वाहतुकीसोबतच दैनंदिन व्यवहार आता सुरू झाले पाहिजेत. लोकांच्या मनातील भीती दूर झाली पाहिजे, हाच या आंदोलनामागचा उद्देश असल्याचं कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा