Advertisement

राज्यातील एकही कोरोनाग्रस्त मंत्री सरकारी रुग्णालयात दाखल का नाही झाला ?

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून ते उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

राज्यातील एकही कोरोनाग्रस्त मंत्री सरकारी रुग्णालयात दाखल का नाही झाला ?
SHARES

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून ते उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. यावरून सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा उत्तम असल्याचं मिरवत आहेत. असं असेल तर, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या मंत्र्यांपैकी एकही मंत्री सरकारी रुग्णालयात का दाखल झाला नाही? असा प्रश्न भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. (opposition leader devendra fadnavis admitted in st george government hospital)

मला कोरोनाची लागण झाली, तर सरकारी दवाखान्यात दाखल करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी महिन्यांपूर्वी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी बोलताना म्हटलं होतं. फडणवीस-महाजन यांच्या फोनवरील संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर देखील व्हायरल झाली होती. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी ! अशी माहिती फडणवीस यांनी स्वत:हून दिली होती.

हेही वाचा- लवकरच दुसरा मुख्यमंत्री येईल, कंगनाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

त्यानंतर फडणवीस मुंबईतील सेंट जाॅर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले. फडणवीस यांनी बोललेलं करून दाखवलं, असं म्हणत सध्या त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरू आहे.

तर दुसऱ्या बाजूला, आतापर्यंत सरकारी आरोग्य यंत्रणेवर दोषारोप करणारे देवेंद्र फडणवीस स्वत:हून सरकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत, याचाच अर्थ सरकारी आरोग्य व्यवथा दर्जेदार असल्याचं त्यांना पटलेलं आहे, असं म्हणत सरकारमधील मंत्री देखील आपली पाठ थोपटून घेत आहेत.

यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस कोरोना झाल्यानंतर सरकारी हॉस्पिटल भरती झाले. यावरून सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे. 

मग कोरोनाची लागण झालेल्या १६ पैकी एकाही मंत्र्याने शासकीय इस्पितळात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही ? असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement