Advertisement

अर्णब गोस्वामींच्या अटकेची भाजप नेत्यांकडून थेट आणीबाणीशी तुलना

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजपचे नेते पोलिसांच्या कारवाईची थेट आणीबाणीशी तुलना करू लागले आहेत.

अर्णब गोस्वामींच्या अटकेची भाजप नेत्यांकडून थेट आणीबाणीशी तुलना
SHARES

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजपचे नेते पोलिसांच्या कारवाईची थेट आणीबाणीशी तुलना करू लागले आहेत. आणीबाणीचं समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला आहे.

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अलिबाग पोलिसांनी अटक केली. या अटकेचे देशभरात पडसाद उमटले असून भाजप (bjp) नेत्यांकडून या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. काही नेते तर या अटकेची थेट आणीबाणीशी तुलना करू लागले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आणीबाणी १९७७मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे. (opposition leader devendra fadnavis slams congress and maharashtra government on arnab goswami arrest)

हेही वाचा- तर माझा नवरा जिवंत असता, अक्षता नाईक यांचा अर्णबवर आरोप

सामुहिक हिंसाचार भडकवणाऱ्यांना पाठिंबा देत असलेल्या काँग्रेसचा भांडाफोड करणारे अर्णब गोस्वामी यांना त्याबद्दलच शिक्षा होत आहे. टुकडे टुकडे गँग असो की पालघरचे आरोपी यांना शरण देणारे कोण आहेत? याचं उत्तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दिलं पाहिजे. काँग्रेसच्या (congress) इशाऱ्यावर नाचणारं कमकुवत सरकार राज्याला आणीबाणीकडे घेऊन चाललं आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या बाता करणारे आता कुठं लपून बसले आहेत? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

तर त्याआधी भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती, ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. 

काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे की हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात.. महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही. आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविलं होतं, आता देखील थांबवणार, असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

हेही वाचा- अर्णबवर सुडाच्या भावनेतून कारवाई- चंद्रकांत पाटील

Read this story in English
संबंधित विषय