Advertisement

केवळ अधिवेशनावर निर्बंध आणणं योग्य नाही- देवेंद्र फडणवीस

सार्‍या गोष्टी अनलॉक होत असताना केवळ अधिवेशनावर निर्बंध आणणे योग्य नाही, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कालावधीवर नाराजी व्यक्त केली.

केवळ अधिवेशनावर निर्बंध आणणं योग्य नाही- देवेंद्र फडणवीस
SHARES

किमान २ आठवड्यांचे अधिवेशन व्हावं, अशी आमची मागणी होती. पण, सत्ताधार्‍यांनी ती मान्य केली नाही. महाराष्ट्रात (maharashtra) सार्‍या गोष्टी अनलॉक होत असताना केवळ अधिवेशनावर निर्बंध आणणे योग्य नाही, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कालावधीवर नाराजी व्यक्त केली.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईतच घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोरोनामुळे विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन देखील पुढं ढकलण्यात येऊन थोडक्यात आटोपण्यात आलं होतं. त्यात पुन्हा पावसाळी अधिवेशन देखील २ दिवासांत आटोपण्यात येणार असल्याने भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा- महाविकास आघाडीची पाॅवर जोखण्यात कमी पडलो- देवेंद्र फडणवीस

त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, किमान २ आठवड्यांचं अधिवेशन व्हावं, अशी आमची मागणी होती. पण, सत्ताधार्‍यांनी ती मान्य केली नाही. सार्‍या गोष्टी अनलॉक होत असताना केवळ अधिवेशनावर निर्बंध आणणे योग्य नाही. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात व्हावं, अशी मागणी आम्ही केली आहे.

आज शेतकर्‍यांपुढे अभूतपूर्व संकट आहे. पाऊस, पूर, चक्रीवादळ, रोगराईमुळे शेती नष्ट झालेली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र नुकसान झालेलं आहे. नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. मराठा आरक्षणाचा घोळ, ओबीसी समाजात भीतीचं वातावरण, महिला अत्याचाराच्या घटना दररोज घडत आहेत. विधीमंडळात यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्यावर सरकारचं धोरण स्पष्ट झालं पाहिजे. पण, सातत्याने सरकार अधिवेशन टाळत आहे, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.

त्यातच कोरानाचं संकट अजूनही संपलेलं नाही. विधीमंडळ अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकप्रतिनिधी येतात. विविध प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सर्वसामान्य एकवटतात, काही वेळेस आंदोलनं केली जातात. यामुळे कोरानाचा संसर्ग वाढू शकतो, हा अंदाज घेऊन कमी कालावधीचं अधिवेशन ठेवण्यात आलं आहे. परंतु दोन दिवसाचं अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही. यामुळे अधिवेशन कामकाज जादा कालावधीत कसं चालेल, यासाठी नवीन नियमावली कशी करता येईल यावर चर्चा सुरू असल्याची माहिती नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

(opposition leader devendra fadnavis unhappy on 2 day winter session of maharashtra legislative assembly)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा