Advertisement

आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर करू नये - विखे पाटील


आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर करू नये - विखे पाटील
SHARES

दूध खरेदी दर वाढवून उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलन सुरू केलं. दरम्यान सरकारने बळाचा वापर करून दूध उत्पादकांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे.


काय म्हणाले विखे पाटील?

'सरकारच्या कथनी आणि करणीत फरक असल्यामुळे दूध आंदोलन पेटलं आहे. त्याला काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे. दुधाच्या प्रश्नावर आज आम्ही विधानसभेत नियम 57 आणि 97 अंतर्गत स्थगन प्रस्तावाची सूचना दिलेली आहे.

सरकारने बळाचा वापर करून दूध उत्पादकांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नये किंवा तशी धमकीही देऊ नये. राज्यात शेतकऱ्यांवर दडपशाही झाली तर त्याची जबर किंमत सरकारला मोजावी लागेल, हे सरकारनं ध्यानात ठेवावं'.


तीन रुपये दर वाढवले

रविवारी राज्यातील काही सहकारी आणि खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात तीन रुपयांनी दरवाढ केली मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ती फेटाळून लावत रविवारी मध्यरात्रीपासून दुधकोंडी आंदोलन सुरू केलं.


हेही वाचा -

राज्यभर दूधकोंडी आंदोलनाला सुरुवात, गोकुळचं दूध संकलन बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा