Advertisement

फडणवीस, उद्धव 'ठग्ज आॅफ महाराष्ट्र'; विरोधकांची अनोखी पोस्टररबाजी

रविवारी सकाळी मुंबईत विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील गटनेत्यांच्या बैठकीनंतर विरोधकांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. पण पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच ही पत्रकार परिषद चर्चेची ठरली ती व्यासपीठावरील अनोख्या पोस्टरमुळे.

फडणवीस, उद्धव 'ठग्ज आॅफ महाराष्ट्र'; विरोधकांची अनोखी पोस्टररबाजी
SHARES

हिवाळी अधिवेशन सुरू होण्यासाठी अवघे काही तासच उरले असून हे अधिवेशन वादळी ठरणार अशी चिन्हं आहेत. मराठा आरक्षण आणि दुष्काळ या मुख्य मुद्यांसह अन्य मुद्यांवर विरोधक आक्रमक पवित्रा अधिवेशनात घेणार याचा अंदाज रविवारच्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेच्या व्यासपीठावरील एका अनोख्या पोस्टरवरून येत आहे. ठग्ज आॅफ हिंदुस्थान सिनेमाच्या पोस्टरवर आधारीत असं पोस्टर विरोधकांनी तयार केलं अाहे. ठग्ज आॅफ महाराष्ट्र, ढगबाजीची चार वर्षे असा मथळा या पोस्टरवर आहे. 


सत्ताधाऱ्यांची खिल्ली

 या पोस्टरवर अामीर खानच्या भूमिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर अमिताभ बच्चनच्या भूमिकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवण्यात आलं आहे. या पोस्टरच्या माध्यमातून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच खिल्ली उडवत अधिवेशनात सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेण्यास सुरूवात केली आहे. 


गटनेत्यांची बैठक 

रविवारी सकाळी मुंबईत विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील गटनेत्यांची बैठक सुरू झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. तर अधिवेशनात सरकारला मराठा-धनगर आरक्षण आणि दुष्काळासह अन्य मुद्यांवर कसं घेरायचं याबाबत मोर्चेबांधणी झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर विरोधकांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. पण पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच ही पत्रकार परिषद चर्चेची ठरली ती व्यासपीठावरील अनोख्या पोस्टरमुळे.


अनेक मुद्यांवरील मथळे

जनतेशी ढगबाजी, औद्योगिक ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी, बेरोजगारांशी ठगबाजी, भावनिक ठगबाजी अशा अनेक मुद्यांवरील मथळे देत तयार करण्यात आलेलं विरोधकांचं पोस्टर प्रत्येकाचं लक्ष केंद्रीत करत होतं. या पोस्टरवर अामीरच्या भूमिकेत मुख्यमंत्री तर बच्चनच्या भूमिकेत उद्धव ठाकरे दिसत होते. तर पोस्टरखालील वाक्यही सत्ताधाऱ्यांना झोंबणारं असं होतं. पोस्टरवरील फोटोच्या खाली ठग्ज आॅफ महाराष्ट्र, ठगबाजीची चार वर्षे असं बोचऱ्या शब्दात लिहिलं होतं. 


अपयशाचा पाढा 

या पोस्टरच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या चार वर्षातील अपयशाचा पाढा वाचण्यात आला आहे. तर सत्ताधाऱ्यांची खिल्लीही विरोधकांनी उडवली असून अधिवेशनात सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेणार असल्याचंही यातून दाखवून दिलं आहे. 



हेही वाचा - 

...अन्यथा दहा दिवसांनंतर पाणी न पिता आमरण उपोषण

काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी सज्जः अशोक चव्हाण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा