Advertisement

साम, दाम, दंड, भेदाने आणा पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात- आदित्य ठाकरे


साम, दाम, दंड, भेदाने आणा पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात- आदित्य ठाकरे
SHARES

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान व्हायरल झालेल्या आॅडियो क्लिपवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात खडाजंगी सुरू असताना या वादाच्या आखाड्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही एण्ट्री घेतली आहे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करायचाच असल्यास मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी त्याचा वापर करावा, असं ट्विट करत आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.


काय म्हणाले आदित्य?

देशातील इतर राज्यांची तुलना करता महाराष्ट्रात इंधनाचे दर सर्वाधिक आहे. तसंच इतर शहरांच्या तुलनेत मुंबईही इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. निवडणुकीत साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याऐवजी सरकार इंधनाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी करेल, अशी अपेक्षा आहे. २०१४ मध्ये सरकार सर्वांना आश्वासन देताना दिसत होती, आता मात्र माफी मागताना दिसत आहे.


 

गाजलेल्या ऑडिओ क्लिपचा आधार

पालघर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना पालघरची निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेने या क्लिपमध्ये फेरफार करुन व्हायरल केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. ही आॅडियो क्लिप निवडणूक आयोगाकडे सोपवून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.



हेही वाचा-

क्लिपप्रकरणी दोषी आढळल्यास कारवाई करा- मुख्यमंत्री

'बविआ'चा गनिमी कावा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा