Advertisement

क्लिपप्रकरणी दोषी आढळल्यास कारवाई करा- मुख्यमंत्री

या क्लिपमध्ये मी दोषी आढळल्यास माझ्यावर कारवाई कारावी नाहीतर, व्हायरल क्लिपमध्ये एडिटिंग झाल्याचं, छेडछाड झाल्याचं स्पष्ट झाल्यावर तसं करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाला केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

क्लिपप्रकरणी दोषी आढळल्यास कारवाई करा- मुख्यमंत्री
SHARES

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान व्हायरल झालेली संपूर्ण वादग्रस्त आॅडियो क्लिप मी राज्य निवडणूक आयोगाकडे चौकशीसाठी पाठवली आहे. या क्लिपमध्ये मी दोषी आढळल्यास निवडणूक आयोगाने माझ्यावर कारवाई करावी अन्यथा ज्यांनी या क्लिपमध्ये छेडछाड केलीय, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाला केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

भाजपा सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी मुंबईच्या भाजपा कार्यालयात रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आॅडियो क्लिपप्रकरणी पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केलं.


शिवसेनेनेच केली छेडछाड

प्रचारादरम्यान व्हायरल झालेल्या आॅडियो क्लिपमध्ये शिवसेनेने जाणीवपूर्ण छेडछाड केली. त्यामुळे कुठलीही काटछाट नसलेली संपूर्ण १४ मिनिटांची आॅडियो क्लिप मी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. या क्लिपमध्ये मी दोषी आढळल्यास माझ्यावर कारवाई कारावी नाहीतर, व्हायरल क्लिपमध्ये एडिटिंग झाल्याचं, छेडछाड झाल्याचं स्पष्ट झाल्यावर तसं करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाला केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.


अर्थ नक्कीच शिकवू

रविवारी दुपारी नालेसफाईच्या कामाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांना उद्देशून साम, दाम, दंड, भेदचा अर्थ समजावून सांगण्याचं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना शिवसेनेला साम, दाम, दंड, भेदचा अर्थ नक्कीच शिकवू असं मुख्यमंत्री म्हणाले.



हेही वाचा-

'शिवाजीचं नाव घेऊन अफझलखानासारखं काम', योगीचा शिवसेनेवर बाण

...तर मी इथं भाजपाच्या प्रचारासाठी आलो असतो- उद्धव ठाकरे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा