Advertisement

राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना धक्का; निष्ठावान कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश


राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना धक्का; निष्ठावान कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश
SHARES

जोगेश्वरी पूर्व मतदार संघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा हा मतदारसंघ आहे. त्यातच शिवसेनेचे व्यापार विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सांवत यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ज्ञानेश्वर सावंत हे वायकरांचे एकेकाळचे कट्टर समर्थक मानले जात असत. त्यांनीच आता शिवसेनेला रामराम केल्यामुळे वायकरांना हा धक्का असल्याचे बोलले जात होते.


विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोणातून खेळी

2019 मध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. 2014 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक रवींद्र वायकर यांच्या समोर भाजपाकडून उज्ज्वला मोडक या लढल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. मात्र आता त्यांनी काही शिवसैनिकांना गळाला लावण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू आहे.


तिकीट न दिल्यामुळे नाराजी

मुंबई महानगरपालिका 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने तिकीट न दिल्यामुळे शिवसेनेचे व्यापार विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सांवत, माजी उपविभाग प्रमुख श्रीधर खाडे यांनी पक्षांतर्गत नाराजीमुळे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 77 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले ज्ञानेश्वर सांवत, श्रीधर खाडे या दोघांनाही पराभव पत्करावा लागला होता. महापालिका निवडणुकीत पक्षाने तिकीट न दिल्यामुळे ज्ञानेश्वर सांवत, श्रीधर खाडे मागील कित्येक महिन्यांपासून नाराज होते. त्यामुळे ज्ञानेश्वर सांवत यांनी शिवसेनेला रामराम केल्याचे बोलले जात आहे.

यावेळी ज्ञानेश्वर सांवत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख श्रीधर खाडे, माजी उपशाखा प्रमुख संजय म्हात्रे, प्रमोद दळवी, स्वप्नील सुर्वे, प्रकाश शिंदे, प्रमोद कदम, सुभाष साळवी यांनी देखील भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. जोगेश्वरीत ज्ञानेश्वर सांवत मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांचा आणि शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांचा ज्ञानेश्वर सांवत यांना पाठिंबा असल्याने त्यांनी सुद्धा यावेळी भाजपात प्रवेश केला.

भारतीय जनता पक्ष सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, या पक्षात सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा नेतृत्व करण्याची संधी दिली जाते. ज्या माणसावर आपण विश्वास दाखवला, त्या माणसाने तुमचा विश्वासघात केला असल्याचा टोला, राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना आशिष शेलार यांनी लगावला. यावेळी कार्यक्रमात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, जिल्हा अध्यक्ष अमित साटम, प्रभाग समिती अध्यक्ष उज्ज्वला मोडक उपस्थित होत्या.



हेही वाचा - 

भाजपा प्रवेश 'राणे स्टाइल`मध्ये!

आता भाजपाच्या भात्यातील बाण सुटणार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा