Advertisement

राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही आपली संस्कृती नाही, देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

'राजकीय विरोधकांचे फोन टॅप (phone tapping) करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला (israeli) जाऊन चौकशी करा,' असं प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही आपली संस्कृती नाही, देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले
SHARES

'राजकीय विरोधकांचे फोन टॅप (phone tapping) करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला (israeli) जाऊन चौकशी करा,' असं प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी फोन टॅपिंगवरून लावण्यात येणाऱ्या आरोपांना दिलं आहे. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmikh) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

भाजप सरकारने (bjp government) विधानसभा निवडणुकीच्या (vidhan sabha election 2019) काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar), शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. 

हेही वाचा- मशिदींवरील भोंग्यांचा त्रास आताच का? जलील यांचा राज ठाकरेंना सवाल

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (digvijay singh) यांनी प्रसार माध्यमांसमोर यासंदर्भातील आरोप केले होते. फोन टॅपिंगसाठी आणि व्हॉट्सअॅप मेसेज अनधिकृतरित्या पाहण्यासाठी इस्रायली कंपनीकडून 'पेगॅसस' (pegasus spyware) ही प्रणाली सरकारकडून विकत घेण्यात आली होती. त्यासाठी काही अधिकारी इस्रायलला (israeli) गेल्याचा आरोप सिंग यांनी लावला होता. या आरोपानंतर विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले.

मात्र देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ' राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही आपली संस्कृती नाही. राज्य सरकारनं तसे कुठलेही आदेश अधिकाऱ्यांना दिले नव्हते. जे आरोप करताहेत, त्यांची विश्वासार्हता किती आहे हे त्यांनाही माहीत आहे. आमच्या सरकारमध्ये गृहराज्य मंत्री खुद्द शिवसेनेचेच होते. तरीही सरकारला चौकशी करायची असेल तर ती तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा. वाटल्यास सरकारने इस्रायलला (israeli) जाऊन चौकशी करून तसा अहवाल सादर करावा,' असं फडणवीस म्हणाले.

भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्याने या फोन टॅपिंगची माहिती दिल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी केला. तर फोन टॅपिंग ही विकृती असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. या सर्व गदारोळानंतर सायबर सेलच्या माध्यमातून या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. 

हेही वाचा- शरद पवारांची सुरक्षा काढली, राष्ट्रवादीकडून नाराजी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा