Advertisement

मशिदींवरील भोंग्यांचा त्रास आताच का? जलील यांचा राज ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ​राज ठाकरे​​​ (raj thackeray) इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. परंतु त्यांच्या कानांना मशिदींवरील भोंग्यांचा त्रास आताच का झाला? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

मशिदींवरील भोंग्यांचा त्रास आताच का? जलील यांचा राज ठाकरेंना सवाल
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. परंतु त्यांच्या कानांना मशिदींवरील भोंग्यांचा त्रास आताच का झाला? असा सवाल एमआयएमचे (aimim party) खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी केला आहे. केवळ मतांच्या ध्रुवीकरणासाठी राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका स्वीकारत आहे. आम्ही अनेकांना आजपर्यंत शिंगावर घेतलंय, त्यामुळे मनसेलाही घाबरत नाही, असं म्हणत त्यांनी मनसेला खुलं आव्हानही दिलं. 

मुंबईतील गोरेगाव इथं गुरूवारी मनसेचं पहिलं महाअधिवेश (goregaon seminar) झालं. या महाअधिवेशनात कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात राज ठाकरे (raj thackeray) यांनी हिंदुत्ववादी (hindutva) विचारांवर आपली भूमिका मांडली. यावेळी मुस्लिम (muslim) समुदायावरही त्यांनी भाष्य केलं. 

हेही वाचा- माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो… राज ठाकरे हिंदुत्वाच्या ट्रॅकवर

ते म्हणाले, हिंदुस्थानात जन्मलेला प्रत्येक मुस्लिम हा भारतीयच असल्याचं आम्ही मानतो. देशाशी प्रामाणिक मुस्लिम हे आमचचे आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान आणि जावेद अख्तर यांना नाकारता येणार नाही. पण बांगलादेश, पाकिस्तानातून आलेल्या मुस्लिमांना आपण का पोसायचं? त्यांना शोधून काढत देशाबाहेर हाकलून दिलं पाहिजे. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या सुधारीत नागरिकत्व कायद्याला पाठिंबा द्यायला तयार आहोत.

ते पुढं म्हणाले, प्रत्येकाने आपला धर्म हा घरातच ठेवला पाहिजे. आमची आरती जर कुणाला त्रास देत नसेल, तर नमाजाचा (namaz) त्रास का व्हायला हवा? त्यामुळे मशिदीवरील भोंगे (loudspeaker) बंद झाले पाहिजेत. नमाजाचं पठण करायला आमची हरकत नाही, पण त्यासाठी भोंगे लावण्याची गरज काय? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा जलील (imtiyaz jaleel) यांनी समाचार घेतला. 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. परंतु त्यांच्या कानांना मशिदींवरील भोंग्यांचा (loudspeaker on masjid) त्रास आताच का झाला? शिवसेनेने काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत (ncp) मिळून सत्ता स्थापन केल्याने ती आता धर्मनिरपेक्ष झाली आहे. त्यामुळं तयार झालेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठीच मनसेकडून हिंदुत्वाचं राजकारण केलं जात आहे. पण आता लोकं हुशार झाली आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी यापुढं विचार करूनच बोललेलं बरं. 

हेही वाचा- शिवसेनेसोबत सरकार स्थापन करा, अल्पसंख्याकांनीच सांगितलं- शरद पवार

दरम्यान राज ठाकरेंनी या महाअधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचंही (saffron flag) अनावरण केलं. हा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्या मधोमध शिवरायांची राजमुद्रा आहे. शिवाय राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरूवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… अशी साद घालत केली. यावरून मनसे यापुढं हिंदुत्वाच्या वाटेवरून चालणार हे स्पष्ट झालं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा