Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नरेंद्र मोदी सकाळीच एम्स रुग्णालयात पोहोचले होते. मोदींनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नरेंद्र मोदी सकाळीच एम्स रुग्णालयात पोहोचले होते. मोदींनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. याआधी १ मार्चला मोदींनी लसीचा पहिला डोस घेतला होता. लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद मिळत नसतानाच मोदींनी लस घेतल्यानं लसीकरणाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झालेली पहायला मिळाली होती. 

कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण हा एक मार्ग असल्याचं यावेळी मोदी यांनी म्हटलं. 'एम्स रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला हरवण्यासाठी असणाऱ्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक मार्ग आहे. जर तुम्ही करोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच डोस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा', असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक कोरोनाबाधित झाले आहेत. गेल्या ३ दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला आहे. एकूण १ लाख १५ हजार ७३६ इतके रुग्ण चोवीस तासांत सापडले आहेत. दिवसातील बळींची संख्या ६३० नोंदवली गेली आहे. २८ व्या दिवशीही वाढीचा कल कायम असून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या आता ८ लाख ४३ हजार ४७३ झाली आहे. हे प्रमाण एकूण संसर्गाच्या ६.५९ टक्के आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर हा खाली घसरला असून ९२.११ टक्के झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या १२ फेब्रुवारीला १ लाख ३५ हजार ९२६ होती. ते प्रमाण एकूण रुग्णांच्या १.२५ टक्के होईल. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी १७ लाख ९२ हजार १३५ झाली आहे. मृतांचा दर कमी होऊन तो १.३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

देशात १ लाख ६६ हजार १७७ बळी गेले असून त्यात महाराष्ट्रातील ५६,३३०, तमिळनाडू १२,८०४, कर्नाटक १२,६९६, दिल्ली ११,११३, पश्चिाम बंगाल १०,३५५, उत्तर प्रदेश ८९२४, आंध्र प्रदेश ७२५१, पंजाब ७२१६ याप्रमाणे मृतांची संख्या आहे.



हेही वाचा -

  1. परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वरंटाईन सक्तीचं

  1. कोरोनाची लक्षणं नसलेल्यांची प्रतिजन चाचणी होणार नाही
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा